आता एवढा खर्च झालाच आहे तर…, लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केले होणाऱ्या सूनेशी लग्न, सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का…

इंडोनेशियाच्या साउथ हलमोहरा येथील जायकोटामो गावातील एका धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेव पळून गेला. यामुळे मोठी खळबळ उडाली.

लग्न लागण्याआधी नवरदेव पळून गेला. नंतर लग्नमंडपात एकच गदारोळ सुरु झाला होता. मुलीच्या कुटुंबीयांसाठी ही फार लाजिरवाणी बाब होती. त्यांना आपले तोंड लपवावे लागत होते. यानंतर मात्र नवरदेवाच्या वडिलांनी एक मोठा प्रस्ताव मुलीकडे ठेवला. आपण होणाऱ्या सूनेशी लग्न करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे पुन्हा एकदा गोंधक सुरू झाला. लग्नासाठी मोठा खर्च केला असताना हा सगळा पैसा वाया जाऊ नये यासाठी तरुणाचे वडील लग्नासाठी तयार झाले. यानंतर त्यांचे लग्न देखील झालं.

दरम्यान, या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नवरीमुलगी आणि तिचा सासरा विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत असून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकजण या लग्नाची खिल्ली उडवत असून, काहीजण नवरीमुलीच्या नशिबावर दु:ख व्यक्त करत आहेत. तर काहीजण सासऱ्याचे कौतुक करत आहेत. 

यामुळे याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सध्या लग्न म्हटले तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. अनेककदा छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होतात. आता मात्र या कारणाने वाद झाल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.