आईशी बोलून अर्चना खोलीत गेली, अन् दोनच मिनिटात घडली धक्कादायक घटना, कारण इतकंच की…

एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. साताऱ्यात ही घटना घडली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तिची उंची कमी असल्याने तणावाखाली येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते संभाजीनगर शहरामध्ये असलेल्या सातारा परिसरामध्ये राहात होते. अर्चना ही आईसोबत घरीच होती.

ती रात्री खोलीत गेली, मात्र नंतर आवाज देऊन देखील ती बाहेर आली नाही. आईने खोलीत बघितले असता अर्चनाने खोलीमध्ये गळफास घेतलेला होता. यामुळे आईला एकच धक्का बसला. पोलिसांनी अर्चनाचा मृतदेह खाली उतरवून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केला.

डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चनाचे कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. मात्र, रोजगारासाठी यादव कुटुंबीय अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेल्या सातारा परिसरामध्ये कुटुंबीयांसोबत राहात होती.

अर्चनाला एक बहीण असून ती विवाहित आहे तसेच तिला दोन भाऊ देखील आहेत. अर्चनाचे वडील विजयकुमार हे फरशी बसवण्याचा व्यवसाय करतात तर त्यांच्या पत्नी या गृहिणी आहेत. दरम्यान, स्वतःची उंची कमी असल्यामुळे त्याबद्दल ती सतत विचार करत होती.

तसेच ती तणावाखाली देखील असायची. तिचे वय देखील फक्त २३ वर्ष होते. या घटनेमुळे तिच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.