मराठा आरक्षणासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. यामुळे आता त्यांची तब्येत ढासाळू लागली आहे. यामुळे गावातील सर्व जाती-धर्माच्या महिला, पुरुषांनी अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी धाव घेतली.
यावेळी जरांगे यांच्या आईला मुलाच्या हाताला लावलेले सलाईन पाहून त्यांच्या आईला गहिवरून आले होते. यावेळी त्या म्हणाल्या, साहेब आरक्षण द्या, दहा दिवस झाले माझ्या बाळाला अन्न नाही, पाणी नाही. सरकारने माझ्या बाळाला न्याय द्यावा, अशी आर्त साद त्यांनी घातली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला. दरम्यान, आंदोलनाबाबत सध्या सरकारने अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे जरांगे देखील उपोषणावर ठाम आहेत. यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी जरांगे म्हणाले, की माझ्या गावातील सर्व जाती-धर्माचे लोक इथे आले आहेत. माझी आई ही आली आहे. अनेक जण माझ्या कानात सांगतात आईचा उल्लेख करा. पण आई माझा महाराष्ट्र बाप माझा महाराष्ट्र, असेही ते म्हणाले.
तसेच मी आज समाजाचा आहे. घरी गेल्यानंतर मी तुमचा आहे, असे मनोज जरांगे म्हणताच उपस्थितांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या मुलीने देखील लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
दरम्यान, जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईत गेले असून याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आता हे उपोषण कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.