पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या पिंपळे निलख एका बहाद्दराने थेट घरासमोर जागेत गांजाची झाडे लावण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे याचे भलतेच धाडस आणि या झाडाची चर्चा रंगू लागली आहे. यामुळे पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला.
याबाबत माहिती अशी की, एका भाड्याच्या चाळीत राहणाऱ्या धानेश अनिरुद्ध शर्मा याने घरासमोर गांजाची झाडे लावली. यामुळे अमली विरोधी पथकाने १२ किलो ४६२ ग्रॅम गांजाची झाडे जप्त केली असून याची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
चाळीतील त्याच्या राहत्या खोलीसमोर मोकळी जागा आहे. तेथे काही झाडे आणि झुडपे आहेत. याठिकाणी शर्मा याने गांजाची दोन झाडे लावली होती. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली.
पोलिसांनी लगेच त्याच्या घरी जाऊन कारवाई करत शर्मा याला अटक केले. त्याच्याकडे १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची गांजाची दोन झाडे जप्त करण्यात आली आहेत. याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
धानेश शर्मा हा फर्निचरचे काम करीत असून तो पिंपळे निलख येथे एका चाळीत राहत आहे. त्याने हे कशासाठी केले याचा तपास पोलीस करत असून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करत आहेत.