भाविकांनो सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाच्या नावाखाली भक्तांची होतेय फसवणूक; मोठा कांड झाला उघड

नाशिकमध्ये औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वरमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी मंदिराच्या बाहेर प्रसादासाठी विकले जाणारे पेढे प्रसाद म्हणून आपण विकत घेणार असाल तर सावधान.

हे मलाई पेढे दुधातील नसल्याचे समोर आले आहे. दुधात न बनवता हे पेढे दुधाचेच असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तुमची फसवणूक तर होतच आहे, मात्र ते आरोग्यासाठी देखील चांगले नसल्याचे समोर आले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिर परिसरात हे मलाई पेढे विकले जात होते. दुधापासून बनवलेल्या मलईचे वाटावेत असे हे पेढे विक्रिला होते. मात्र हे पेढे दुधाच्या मलई पासून नाही तर गुजरातमधून विकल्या जाणाऱ्या रिच स्वीट डिलाइट अनलॉग या अन्न पदार्थापासून तयार केल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पदार्थ दुधाची स्कीम पावडर आणि पाम तेलापासून बनवला जात असल्याचे समोर आले. याठिकाणी 3200 रुपयांचे पेढे नष्ट करून 14 हजार रुपये किमतीच्या डिलाईट स्वीट अनलॉगच्या 8 पिशव्या जप्त केल्या आहेत. यामुळे आता अशा प्रकारे कोणी विक्री करत असेल तर कारवाई होणार आहे.

दरम्यान, हे पेढे तुमच्या जीवाला धोका निर्माण करु शकतात. त्यामुळे असे उघड्यावरचे पेढे विकत घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे. एक किलो दुधापासून बनवण्यात आलेले पेढे 500 ते 700 रुपये किलोने मिळतात. त्यामुळे 200 ते 300 रुपये किलोने मिळणाऱ्या पेढ्यांबाबत ग्राहकांनी विचार करावा.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त विवेक पाटील म्हणाले, की याठिकाणी बॉक्स मलाई पेढा म्हणून विक्री करत होता. त्यामध्ये मलाई असणे अपेक्षित होते. पण त्यात तसे काही नव्हते म्हणून आमच्या विभागाने आठ किलो पेढे जप्त करुन नष्ट केले.