आशा भोसलेंनी लग्नासाठी दादा कोंडकेंना घातल्या होत्या ‘या’ २ अजब अटी, अटी ऐकून दादा म्हणाले…

प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले आजपासून नव्वदीत प्रवेश करत आहेत. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. त्यांच्याबद्दल अनेक माहिती नसलेल्या गोष्टी आजची ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. अनेकांना हे माहिती नाही की, विनोदी चित्रपटात अजरामर झालेले दादा कोंडके सत्तरच्या दशकात दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते.

दरम्यान, 1967 च्या काळात आशाताई भोसले पहिल्यांदाच दादांच्या आयुष्यात आल्या. त्यावेळी दादा त्यांच्या कामांत अत्यंत व्यस्त होते. आशाताई विच्छामुळेच दादांच्या सहवासात आल्या होत्या म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे प्रयोग नसल्यास आशाताईंकडून दादांना भटकंतीसाठी घेऊन जात होत्या.

दादांना जेव्हा जेव्हा वेळ असायचा त्यावेळी आशाताई त्यांना रेकाॅर्डिंगला नेत असत. तसेच बड्या मातब्बरांशी सुद्धा ओळख करून देत होत्या. त्यांचं सगळं काही ठीक चालले होते.

आशाबाई आणि दादांचे आधीचलग्न झाले होते मात्र दोघांचेही लग्न टिकले नाही. नंतर आशाताई यांनी दादा कोंडके यांना लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तसेच त्यांना दोन अटी घातल्याने ते चांगलेच संकटात सापडले होते.

यामध्ये अटी अशा होत्या की, आशाबाई यांनी लग्नानंतर कोंडके आडनाव वापरणार नाही आणि लग्नानंतर त्यांच्या फ्लॅटवर राहण्याची अट घातली होती. यामुळे दादा गोंधळून गेले होते. यामुळे दादांनी गुरुस्थांनी मानलेल्या आणि बाबा म्हणत असलेल्या भालजी पेंढारकर यांना याबाबत विचारण्यासाठी  कोल्हापूर गाठले होते.

दादांनी याबाबत भालजींना माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले होते की, अजिबात या लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही. तुम्हाला कार्यक्रम आहेत. त्यांना मुलबाळं आहेत. त्यांच्या घरी तुम्हाला गड्याचे काम करावे लागेल.

यामुळे दादांनी लग्नाला नकार दिला. मात्र, दोघांमधील व्यावसायिक संबंध कायम राहिले. कालातरांने दादा कोंडके यांच्या घरी जाण्याचे बंद केले. त्यानंतर आशाबाई संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

दरम्यान, आशाबाई पहिल्या विवाहापासून वेगळ्या झाल्या होत्या आणि मुलंसुद्धा होती. आशाताई आणि दादांच्या संबंधांविषयी लतादीदी यांनाही माहिती होती. पुढे त्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे नाव कमवलं,