मृत्यूनंतरही थांबल्या नाहीत यातना! स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा आणला घरी; नेमकं प्रकार काय? वाचा..

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या नवेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी स्मशानभूमीच्या वादातून अंत्यसंस्कारास विरोध झाला. यामुळे वृद्ध महिलेचा मृतदेह घरी परत घेऊन जाण्याची वेळ आली. सरस्वती लक्ष्मण कातकर (८५) असे मृत महिलेचे नाव आहे.

गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने मृतदेहालाही वेदना भोगाव्या लागल्या यामुळे याची चर्चा सुरू आहे. नवेगाव येथील सरस्वती लक्ष्मण कातकर या वृद्ध महिलेचा आजाराने मृत्यू झाला. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी नवेगाव गावाला हक्काची स्मशानभूमीची जागा नाही.

यामुळे गावाबाहेरील शेतात मृतदेह नेण्यात आले. ती जागा शासनाची आहे. मात्र त्या जागेवर एका शेतकऱ्याने अतिक्रम केल्याच्या आरोप आहे. यामुळे त्याठिकाणी विरोध होतो. यामुळे असा प्रसंग पुढे येतो.

दरम्यान, या शेतकऱ्याने आपल्या जागेत अंत्यसंस्कार करण्यासाठी मनाई केली. त्यामुळे मृतदेह बराच वेळ रस्त्यावर ठेवण्यात आला होता. यामुळे मोठा खोळंबा झाला. यामुळे कायमस्वरूपीचा मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.

अखेर प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले. गावातील सरपंचाच्या मध्यस्थीने शेतकरी आणि कुटुंबाची समजूत काढण्यात आली. नंतर त्याच शेतात अंतिमसंस्कार करण्याचे ठरले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज अंतिमसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, मृतदेह बराच वेळ रस्त्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर स्मशानभूमीत नेलेला मृतदेह परत घरी आणला गेला. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलीस आल्यानंतर मार्ग काढण्यात आला.