एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत खरी माहिती समोर आल्याने धक्कादायक प्रकार बाहेर आला आहे.
या मुलीची तिच्या मित्रांनी छेड काढली होती. यामुळे ती मानसिक तणावात गेली होती. यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ती कोणाशीच बोलत नव्हती.
तिच्या भावाने देखील तिची विचारपूस केली असता मुलीने घडलेला सर्व धक्कादायक प्रसंग सांगितला. तो रागाच्या भरात घराबाहेर गेल्यानंतर या मुलीने आत्महत्या केली. तो घरी येताच त्याला मोठा धक्का बसला.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणी, तिचे मित्र त्यांची चौकशी सुरु केली. यामध्ये या मुलीला चार दिवसापूर्वी तिच्या दोन मित्रांनी तिला सांगितले की, आपण मॉलमध्ये जाऊ. तसेच तिला घरून बोलवून घेतले. मॉलजवळ सगळे आले असता तेथील एकाच्या घरी तिला नेले.
याठिकाणी या चौघांनी मुलीसोबत छेडछाड करत तिला धमकावले. घरी सांगू नको, नाही तर आम्ही काय करायचे ते बघू असी धमकी दिली, यामुळे ती खूप टेन्शनमध्ये गेली. यामुळे तिने हा मानसिक धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली.
दरम्यान, मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या विरोधात भादवि ३०६ , ३५४, ३४ पोक्सा ८,१२ प्रमाणे चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपींचा तपास करत आहेत.