मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा १५ वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये सरकारने सुधारणा न केल्याने मनोज जरांगे यांनी पाणी आणि सलाईन बंद केले होते.
यामुळे चिंता वाढली होती. मनोज जरांगे यांनी रविवारी सकाळपासून पाणी आणि सलाईनचा त्याग केला होता. यामुळे मनोज मनोज जरांगे पाटील यांना थकवा आणि अशक्तपणा आला होता. तसेच डॉक्टर उपचार देखील नाकारले होते.
असे असताना त्यांना खूपच त्रास जाणवू लागल्याने गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह धरला. हा आग्रह मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेतले. यामुळे आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आता सकाळी ते पत्रकार परिषद घेणार आहोत.
आज ते बैठक देखील घेणार असून यामध्ये काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल. ते म्हणाले, सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार आहे. पण मराठा समाजाला खरंच आरक्षण देणार का.? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.
दरम्यान, गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायची क्षमता राहिलेली नाही. यामुळे उपचार सुरू केल्याचे म्हटले आहे. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काल सरकारसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क आणि चर्चा झाली नाही. आरक्षण मिळत नाही हेच दुखणे आणि आरक्षण हाच आपल्या प्रकृतीवर उपाय असल्याचे मनोज पाटील जरांगे यांनी रात्री सांगितले. यामुळे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.