साताऱ्यात मोठी दंगल, एकाचा मृत्यू, हल्ल्यात 10 जखमी, 200 जणांवर गुन्हा, नेमकं घडलं काय?

साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टवरुन दोन गट आपापसांत भिडले. यामुळे मोठा राडा झाला आहे. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 15 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर काही वाहनं पेटवण्यात आली, तर प्रार्थना स्थळांचीही जाळपोळ करण्यात आली. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस उपस्थित होते.

यानंतर पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. याठिकाणी विशिष्ठ समुदायास यामुळे लक्ष्य करण्यात आले आहे.

परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाली. अनेक घरे आणि दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून येत आहे. तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याठिकाणी पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. रात्री विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक झाली आहे. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. पोस्टवरुन रात्री उशीरा युवकांच्यामध्ये दंगल उसळली. या दंगलीत व जाळपोळीत 2 दुकाने आणि 2 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. यानंतर वाद वाढत गेला.