‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ चे मूळ गायक तुम्हाला माहितेत का? वाचून धक्काच बसेल…

सध्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे कधी एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी येणार याची वाट सर्वजण बघत आहेत. असे असताना सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यामध्ये एका लहान मुलाच्या आवाजात एक गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे अनेकजण या चिमुकल्याने कौतुक करत आहेत. साईराज केंद्रे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर करण्यात आले.

असे असताना या गाण्याचे मूळ गीतकार असलेल्या वडापाव विक्रेत्याची गाथा समोर आली आहे.
गीतकाराने पाच वर्षापूर्वी वडे तळता तळता या गाण्याची धून तयार केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी हेच गाणे गायले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

असे असताना मात्र त्या मानाने त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. हे गाणे मूळ माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी 2022 साली गायले होते. सध्या या गाण्याचा मोठा बोलबाला सुरू आहे.

सध्या हे गाणं म्हटलेला साईराजचा व्हिडिओ काही तासातच अनेकांच्या पसंतीस पडला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. साईराजने शाळेच्या गणवेशात व्हिडिओ शूट केल्यामुळे त्याच्या शाळेचीही सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याच्या आवाजत ते गाणं ऐकायला खूपच सुंदर वाटत आहे. सध्या गाणं अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडी ते गाणं ऐकायला येत आहे.

यामध्ये डान्स त्याच्या स्टेप पाहून आणि त्याचे हावभाव पाहून तुम्ही देखील नक्कीच थक्क व्हाल. या गाण्याला आतापर्यंत तब्बल तीन मिलियन्स इतके व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी ते आपल्या स्टेटसला देखील ठेवले होते.

सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. इन्स्टाग्रम, फेसबुक, युट्युबवर या गाण्याचे रिल्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. यामुळे या चिमूकल्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.