मराठा आरक्षणासाठी मागील पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. यामुळे आता त्यांची तब्येत ढासाळू लागली आहे. त्यांचे आंदोलन बघून बीड जिल्ह्यात देखील आंदोलन सुरु करण्यात आले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बीड जिल्ह्यातील जातेगावातील आंदोलनात एक दाम्पत्य सहभागी झाले होते. त्या दाम्पत्याने आंदोलनातून घरी गेल्यानंतर टोकाचं पाऊल उचलले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे.
गेवराई तालुक्यातील जातेगावात ही घटना घडली. राजेंद्र चव्हाण आणि सोनाली चव्हाण असे या दाम्पत्याचे नाव आहे. चव्हाण दाम्पत्याने जातेगाव येथे चालू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अचानक काही तासानंतर आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.
दरम्यान, आत्महत्या का केली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांनी सोबतच आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, दोघांनी मराठा आरक्षणासाठी गावात ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. याठिकाणी येत त्यांनी घोषणाबाजी केली.
नंतर अचानक काय घडलं हे कोणालाच कळलं नाही आंदोलनापासून काही अंतरावर असलेल्या घरी जाऊन त्यांनी गळफास घेतला. यामुळे तपास सुरू आहे. घटनेनंतर ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि आंदोलकांपर्यंत पोहोचली.
यामुळे सगळेजण घटनास्थळी गेले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. यामुळे याठिकाणी सुरू असलेले आंदोलन देखील स्थगिती करण्यात आले. या घटनेचा तपास सध्या सुरू आहे.