चिंचेच्या झाडाखाली बांधून एकाची हत्या, रचला रक्तरंजित खेळ; आधी सपासप वार अन् नंतर…

नाशिकमधील येथील वणी खेडले येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी किरकोळ वादातून एकाचा खून करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दिडोंरी तालुक्यातील खेडले येथे संदिप हरी मेधने यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, संदिप हरी मेधणे यांच्याबरोबर किरण शरद कदम त्याचा संशयित मित्र अशा दोघांनी किरकोळ कारणावरुन मेधणे यांच्या घरात येऊन वाद घातला. हा वाद वाढतच गेला. त्यानंतर मेधणे यांच्या घराजवळील भागात चिंचेच्या झाडाखाली मेधणे यांना संशयित आरोपी किरण कदम आणि त्याचा मित्र या दोघांनी हत्याराने मेधणे यांच्यावर वार केला.

तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संशयित आरोपी किरण शरद कदम आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारीनुसार नमुद दोन संशयित आरोपी यांच्या विरोधात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चर्चा सध्या तालुक्यात आहे.