नदीत पोहणाऱ्या तरूणासमोर अचानक आली मगर, लोकांचा आरडाओरडा, इतक्यात मगरीने..; सांगलीतील घटना

सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर एक थरारक घटना घडली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणी शहरातील जलतरणपटू नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक मोठी मगर पाण्यात फिरत होती. यामुळे मोठी खळबळ उडाली.

असे असताना याठिकाणी जलतरणपटू त्या मगरीच्या दिशेने पोहत निघाला होता. मात्र नागरिकांनी कालवा केल्यानंतर त्या जलतरणपटूस वेळीच सावध केले. यामुळे मोठी घटना होण्यापूर्वी तो सावध झाला. यामुळे जलतरणपटू शरद राजदीप यांचा जीव थोडक्यात बचावला.

दरम्यान, कृष्णा नदी पात्रात मगरींचा असणारा वावर ही नित्याची बाब आहे. याठिकाणी असणाऱ्या घाटावर अनेकजण दररोज सकाळी पोहण्यासाठी येत असतात. जलतरणपटू शरद राजदीप हे सुद्धा रोज कृष्णा नदीतून पोहण्याचा सराव करतात, असे असताना याठिकाणी मगरीचा वावर वाढला आहे.

दरम्यान, सकाळी शरद राजदीप हे कृष्णा नदीत सांगलीवाडीकडील बाजूने त्याच मार्गाने पोहण्याचा सराव करत होते. नंतर येथील काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध बाजूने एक मगर पोहोत येत असल्याचे लोकांनी पाहिले.

त्यामुळे लोक जोरजोरात ओरडू लागले. राजदीप यांना सावध करू लागले. असे असताना मात्र, कानात एअर प्लग घातलेला असल्याने लोकांचा आवाज शरद राजदीप यांच्या कानावर पोहोचलाच नाही. यामुळे लोकं ओरडतच राहिले.

यामुळे आपल्यासमोर अगदी जवळ अजस्त्र मगर पोहत येत आहे याचा त्यांना पत्ताही लागला नाही. असे असताना मगर स्वतःच पाण्याखाली निघून गेली. या सगळ्याचा राजदीप यांना पत्ताही नव्हता. आता काही खर नाही, असे सर्वांना वाटत होते.

शरद राजदीप आपल्याच गतीने मगरीवरून पोहत पुढे गेले. ऐनवेळी मगरीने सुद्धा शांततेने आपला मार्ग कापणे पसंत केल्यामुळे एका माणसाचा जीव वाचला. यामुळे मोठी घटना टळली. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.