ईडीने अभिनेत्री कृती वर्मा हिच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. २६४ कोटींच्या फसव्या टीडीएस परतावा प्रकरणात कृती वर्मासह तिचा प्रियकर भूषण पाटील, माजी आयकर निरीक्षक तानाजी अधिकारी आणि इतरांवर आरोप आहेत.
कृती वर्मा हिने बिग बॉस, रोडीज एक्स्ट्रीम यासारख्या शोमध्ये सहभाग घेतला होता. कृती भूषण पाटीलसह रिलेशीनशीपमध्ये आहे. भूषण आणि तानाजी अधिकारी या प्रकरणात प्रमुख आरोपी आहेत. यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे.
असे असताना २०२० मध्ये आपण भूषण पाटीलच्या आयुष्यात आल्याचे सांगून कृती वर्माने फसवणूक केल्याचा आरोप फेटाळले. यामध्ये त्यांनी बेकायदेशीरपणे कमावलेला बराचसा पैसा भूषण पाटील यांच्या खात्यात वळवण्यात आला होता. यामुळे या पैशांचा हिशोब त्यांच्याकडे नाही.
तसेच काही रक्कम कृती वर्माच्या नावाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली गेली. तानाजी अधिकारी टीडीएस परतावा विभागात कार्यरत होता. त्याने वरिष्ठ अधिकार्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स शोधून काढली.
तसेच फसवणुकीने मिळवलेले पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणार्या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा यात समावेश आहे. यामुळे अनेकांची चौकशी सुरू आहे. जीएसटी विभागातील नोकरी सोडून मनोरंजन क्षेत्रात उतरलेली अभिनेत्री कृती वर्मा ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.
२६४ कोटींच्या फसव्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. यामध्ये तिचा प्रियकर आणि व्यावसायिक भूषण पाटील, माजी आयकर निरीक्षक तानाजी अधिकारी आणि इतरांवर आरोप आहेत.