दगड पाण्यावर तरंगत होता. दगडावर राम लिहिलेले होते. त्याचे वजन ३ ते ४ किलोंच्या दरम्यान होते. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण ही घटना छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील घुनघुट्टा नदीत घडल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे.
याठिकाणी एक व्यक्ती नदीत आंघोळ करायला गेलेला. नदीत अंघोळ करत असलेल्या व्यक्तीने दगड गावात आणला. त्यावेळी गावात जन्माष्टमीचा सोहळा सुरू होता. भक्तिमय वातावरण होते. यामुळे सर्वांनी ही घटना अतिशय शुभ मानली.
असे असताना राम लिहिलेला दगड त्यांनी घरातील पिंपात टाकला. तो पाण्यावर तरंगू लागला. यामुळे त्यांना मोठे आश्चर्य वाटले, नंतर याठिकाणी ग्रामस्थांची गर्दी केली. याठिकाणी हा देवाचा चमत्कार असल्याचे सांगितलं जाऊ लागलं.
नंतर दगडाची पूजा करण्यात आली. राजवाडेंच्या हातातला दगड पाहून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे ही वार्ता बघता बघता पंचक्रोशीतील पसरली. नंतर हा दगड बघण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली. दरम्यान, हा दगड मंदिरातील पुजाऱ्यांना दाखवला.
हा दगड रामसेतूचा असल्याचे त्यांनी सांगितले. नदीतून वाहत दगड इथंवर पोहोचल्याचे ते म्हणाले. असे असले तरी ज्वालामुखीतून निघालेले दगड अशा प्रकारचे असतात. हा दगड प्यूसिम नावाने ओळखला जातो, असेही सांगितले जाते.
दरम्यान, प्यूसिम दगडाचे घनत्व पाण्यापेक्षा कमी असते. त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. या दगडाला लहान लहान छिद्रं असतात. त्यातून गॅस बाहेर निघून जातो. हा दगड साधारण दगडांपेक्षा वेगळा असतो. या भागात ज्वालामुखीचा उद्रेक खूप पूर्वी होऊन गेला आहे, असेही सांगितले जाते.