पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉय सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आला असता २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे.
याबाबत तपास सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला. त्याने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने स्विगीवरुन काही वस्तू मागवल्या होत्या.
सामान चेक करत असताना त्यात सॅनिटरी पॅडचे पॅकेट फोडल्याचे दिसून आले. तिने स्विगीला मोबाईलवरुन फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला. त्यानंतर नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता. यावेळी त्यांनी वेगळे हावभाव केले.
तसेच यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी तरुणीने स्विगीशी बोलून घ्या, असे त्याला सांगितले. यानंतर त्याने तरुणीला थेट सेक्स करण्यासाठी विचारणा केली. तुम सेक्स करोगी?’ असे म्हणत त्यांने तिचा विनयभंग केला.
मोबाईल फोन चार्जिंग करण्याच्या निमित्ताने घरात येऊन त्याने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत.
या तरुणावर तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न केल्याचा आरोप आहे. यामुळे पोलीस तपास करत असून अशा प्रकारे अनेक घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी डिलीव्हरी बॉयकडून गैरवर्तन झाल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत.