हेमंत पारख अपहरण प्रकरणी मोठी अपडेट; अखेर गूढ उकलले, 2 कोटींसाठी रचला प्लॅन…

काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेमंत हे नाशिकमधील फार मोठे प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.

त्यांचे अपहरण फक्त पैशांच्या हेतून करण्यात आले आहे का? की यामागे वेगळं काही कारण आहे. याबाबत आता माहिती मिळू लागली आहे. आता नाशिक पोलिसांनी राजस्थानमधून एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणारे बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाची तक्रार २ सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. राजस्थान येथील आरोपी महेंद्र बिश्नोई याने साथीदारांच्या मदतीने पारख यांचे अपहरण करून २ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या व्यवसायिकाचे त्याच्याच राहत्या घरातून अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस सीसीटीमधील दृश्यांची मदत घेत आहेत. हेमंत पारख हे नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहतात.

रात्री आपल्या घरी असताना अचानक त्यांच्या घरासमोर दुचाकी आणि चारचाकी आल्या. त्यांना काही कळायच्या आत त्यांचे अपहरण करण्यात आले. सीसीटीव्हीत सगळी घटना दिसत होती. सदर घटना रात्री 10 च्या दरम्यान घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा सवाल आता केला जातोय.