पतीचे अनैतिक संबंध असल्याने तसेच रोजच्या त्रासाला कंटाळून महिलेने विषारी औषध सेवन केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अनिता गोठे, असे मृत पत्नीचे नाव आहे. पतीचे अनैतिक संबंध असताना, पतीने पत्नीला वेळोवेळी मारहाण करत धमकी दिली. पत्नीला माहेरच्यांकडून घर खर्चासाठी पैसे आणण्यासाठी पतीने तिला त्रास दिला. तसेच शारीरिक छळामुळे पत्नीने राहत्या घरात विषारी औषध सेवन केले.
यामध्ये त्यांचे निधन झाले आहे. याबाबत महिलेच्या माहेरच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि पतीची प्रेयसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अनिता गोठे यांचा भाऊ नितीन सीताराम निर्भवणे यांनी अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेला गेल्या आठ नऊ वर्ष त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पतीच्या अज्ञात प्रेयसी विरोधात देखील तक्रार देण्यात आली असून तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेने नाशिकच्या सिडको परिसरात एकच खळबळ उडाली. अंबड पोलीस याबाबत तपास करत असून पोलीस आरोपींना ताब्यात घेत आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.