आपल्याकडे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. अनेकदा यामध्ये अनेकांचे बळी देखील जातात. असे असताना आता सोलापुरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने अमावास्येला स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. यामुळे याची बरीच चर्चा झाली.
यावेळी अंनिसच्या वतीने स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यात आला. अमवास्येला भयंकर असा अंधार असतो आणि अमावास्या असताना स्मशानभूमीबाबत अनेकांच्या मनात भीती असते, अशाप्रकारे आपल्याकडे अनेकांच्या मनात शंका असतात.
अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, स्मशानभूमीत काहीही नसते, याबाबत अंनिसने जनजागृती केली. यामुळे अनेकांच्या मनातील भीती कमी होणार आहे. अनेकांनी याबाबत अफवा पसरवून लोकांमध्ये अनेकांनी भीती निर्माण केली आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू स्मशानभूमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे त्यांनी अमावस्या असलेला दिवस निवडला. अनेकदा या दिवशी नागरिक स्मशानभूमीत जात नाहीत. ही भीती बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मशानभूमीत विविध उपक्रम केले.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत केक आणून खाल्ला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नारळामधून बांगडी काढणे, लाल कापड काढणे, रिकाम्या पातेल्यातून पाणी काढून लोकांची कशी फसवणूक करतात याचे प्रयोग दाखवण्यात आले.
तसेच भानामतीला लागणाऱ्या वस्तू,लिंबू,नारळ आदी साहित्य घेऊन अनिसने जनजागृती केली. अनेक ठिकाणी लोकांना फसवले जाते. तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायला लावल्या जातात.