---Advertisement---

पत्नीने केली पतीची हत्या, 9 वर्षांनंतर सगळा कारनामा झाला उघड, पत्नीचा प्लॅन ऐकून सगळेच हादरले…

---Advertisement---

एका घटनेने तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यामध्ये नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीची कवटी सांडपाण्याची टाकी साफ करताना सापडली आहे. यामुळे याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

येथील देवकोट्टई गंबर स्ट्रीट जवळ राहणाऱ्या एका घरमालकाने सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही लोकांना बोलावलं. यावेळी टाकीत एक कवटी तरंगताना दिसली. याबाबत माहिती पोलीस ठाण्यात दिली गेली. सांडपाण्याच्या टाकीतून मानवी कवटीशिवाय काही हाडेही सापडली.

तसेच हाताला बांधलेली दोरी, शर्ट सापडले आहेत. पोलिसांनी शेजारी पाजारी चौकशी सुरू केली. त्या घरात आठ वर्षांपूर्वी एक महिला राहत असल्याचं पोलिसांना समजले. त्या महिलेचा पती एकदा बाहेरगावी गेला तो कधी परतलाच नाही असे पत्नीने शेजाऱ्यांना सांगितले होते.

याबाबत शेजाऱ्यांनी माहिती दिली. पोलिसांनी महिलेला शोधून तिची चौकशी सुरू केली. तिने पोलिसांना सांगितलं की, तिचा नवरा कोईम्बतूरला गेला असून एका बाईसोबत राहतो. आणि तो खर्चासाठी पैसे पाठवतो.

नंतर मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावर सुकांतीने पोलिसांना काही धक्कादायक माहिती सांगितली. ती कवटी आपल्या पतीचीच असल्याचे तिने सांगितले. तिने पतीचा मृतदेह सांडपाण्याच्या टाकीत फेकल्याचे पोलिसांजवळ कबूल केले.

यामुळे मोठी खळबळ उडाली, दरम्यान 9 वर्षांनी याबाबत पोलिसांना खरी माहिती मिळाली असून घटना समजताच त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. वडील म्हणाले, मी माझ्या नातेवाईकांना 6 वर्षांपूर्वी सांगितलं होते की, सुकांती हिने माझ्या मुलाला मारून नदीत फेकून दिले आहे. पण माझे ऐकले नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---