ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. केज येथे कलाकेंद्राच्या नावाखाली ते वेश्याव्यवसाय चालवत होते अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली होती. असे असतानाच आता सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी अंधारेंवर टीका करत काही गंभीर आरोप केले आहे.
राज्यभरातील काही कलाकेंद्राचे चालक हे सुषमा अंधारे यांच्या संपर्कात आहे. पोलिस त्यांच्यावर कारवाई करु नये, यासाठी ते अंधारेंकडे मागणी करतात. ठिकठिकाणी चालणाऱ्या या गैरप्रकरांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ आहे, अंधारे यातून टक्केवारी घेतात असे वाघमारे यांनी म्हटले आहे.
वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना सुषमा अंधारे पाठबळ देत आहे. त्यांना वाचवण्यासाठी त्या कलाकेंद्रांच्या मालकांकडून टक्केवारी घेत आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सर्वांची चौकशी करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. वाघमारे यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्या विरोधकांवर जोरदार टीकाही करतात. त्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांच्यापासून विभक्त झालेल्या पतीनेच असे गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी केजच्या एका कलाकेंद्रामध्ये पोलिसांनी छापा टाकला होता. कलाकेंद्राच्या नावाखाली याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली होती. याठिकाणी रत्नाकर शिंदे यांची गाडी देखील दिसून आली होती. तसेच या कलाकेंद्राच्या मालकीत ते भागीदार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असे असतानाच रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी २५ लाख रुपये घेतले होते. कलाकेंद्र तु चालव मी पोलिसांची कारवाई होऊ देणार नाही, असे अंधारेंनी शिंदेंना सांगितले. या सर्वांना पाठबळ अंधारेंनीच दिले आहे, असे वैजनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.