घरात पहिल्यांदाच चारचाकी वाहन आल्याचा आनंद कोणाला नसतो. सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी देखील नवीकोरी कार घेतली होती. मात्र नियतीने त्यांच्या घाव घातल्याने सगळं काही संपलं आहे. गाडी घेऊन ते मेहुण्याच्या घरी पेढे द्यायला गेले होते.
त्यांना कार चालवायला येत नव्हती. यामुळे ईरन्ना यांनी एक वाहनचालक सोबती घेतला होता. सासरकडील लोकांना नवीन कार दाखवून माघारी येयच हे त्यांचे नियोजन होते. असे असताना झाडाखाली लावलेल्या कारची ट्रायल घेतानाच ईरन्ना जुजगार यांचे नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत कोसळली.
यामध्ये त्यांचे निधन झाले आहे. ही घटना घडताच जवळ असलेल्या ग्रामस्थांनी विहिरीत उड्या मारून ईरन्ना जुजगार यांना विहिरीच्या बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचे निधन झाले होते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील भाटेवाडी येथे ही घटना घडली. मयत शिक्षक इराण्णा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले. सर्व कुटुंबीय घरात गेले.
त्यावेळी शिक्षक इराण्णा झुजगार हे ड्रायव्हर सीटवर बसले आणि ही कार झाडाखाली लावण्यासाठी स्टार्ट केली. मात्र नियंत्रण सुटल्याने ही कार सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये जाऊन कोसळली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.