---Advertisement---

संभाजीनगरात २ सख्ख्या भावांनी बहीनीची कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या; कारण वाचून हादरून जाल

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी असलेल्या चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. यातून ही घटना घडली आहे.

राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. घाबरलेल्या चंद्रकला यांनी ‘माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे, असे सांगितले.

यामुळे मला वाचवा, कोठे तरी लपवा, असे त्यांनी शमीम यांच्याकडे मागणी केली. नंतर शमीम यांनी तिला त्यांच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. नंतर काही वेळातच चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर हे दोघे तिथे आले.

त्यांनी शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकला यांचा शोध घेऊन मारहाण सुरु केली. कुऱ्हाडीने चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. यामुळे त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यातच त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकला यांचे आई वडील देखील यावेळी उपस्थित होत्या.

त्यांनी दोन्ही मुलांना चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे सांगितले. शमीमने त्यांच्या तावडीतून सुटून थेट पोलीसात धाव घेतली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. प्रेमसंबंधावरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.

फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---