गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेागारीच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता बीडमधून एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपुर्ण बीडमध्येच खळबळ उडाली आहे.
एका तरुणाने वीस वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. तो तरुण तिला सतत फोन करत होता. त्यामुळे आधीच तिचा संसार मोडला होता. त्यानंतर त्या तरुणाने तिला घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केले आहे.
पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळाली असून त्यांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश अजिनाथ राख असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिस याप्रकरणी अजून तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मला तु खुप आवडते असे म्हणत तो तरुण सतत तिला फोन करत होता. त्यामुळे तिच्या पतीमध्ये आणि तिच्यात वाद झाले होते. त्यानंतर तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडले. त्या तरुणीचे माहेर ज्याठिकाणी होते. त्याच गावात तो राहत होता.
माहेरी आल्यानंतरही तो तरुणीशी बोलायचा प्रयत्न करत होता. असे असताना एकदिवस त्याला ती तरुणी घरात एकटी दिसली. ते पाहून तो घरात गेला आणि तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. त्याने तिला याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली होती.
त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने त्या तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कासार पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली गेली आहे. पोलिस त्या तरुणाचा शोध घेत असून या प्रकणामुळे संपुर्ण बीडच हादरलं आहे.