सरकारी अधिकाऱ्याची बॉडी सापडली अंगणातील खड्ड्यात, वर सिमेंटचा कोबा; कारण ठरले ९ लाख अन् ‘ती’…

दिल्लीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरकेपुरम परिसरात सर्व्हे ऑफ इंडिया डिफेन्स ऑफिसर कॉम्प्लेक्सच्या अधिकाऱ्याची त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या लिपिकाने हत्या केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

या हत्येनंतर त्याचा मृतदेह सरकारी फ्लॅटच्या अंगणात पुरला. त्यावर सिमेंट टाकले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, हत्येनंतर महेशबद्दल कोणताच पुरावा सापडत नव्हता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी एक पथक तयार केले होते.

त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन फरीदाबाद हरयाणात होते. यामुळे पोलिसांनी याबाबत तसा तपास केला. त्यानंतर पोलिसांनी महेश सोबत काम करणाऱ्या अनीसला चौकशीला बोलावले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. अनीसने महेशच्या हत्येची कबुली दिली.

यामुळे सगळी घटना उघडकीस आली. हत्येबाबत पोलिसांनी कारण विचारले असता तो म्हणाला, महेश कुमार माझ्या प्रेयसीकडे वाकड्या नजरेने बघायचा. त्याशिवाय त्याने माझे ९ लाख परत केले नाहीत. अनेकदा त्याला समजावून सांगितले मात्र त्याने ऐकले नाही.

तो उधारी चुकती करत नव्हता. त्यामुळे महेशची हत्या केल्याचे अनीसने पोलिसांना सांगितले. एक फावडं खरेदी केले. महेशला घरी बोलावले. काही वेळातच महेश आरकेपुरमच्या सेक्टर २ मधील माझ्या घरी आला. तेव्हा डोक्यात पाईप मारुन त्याची हत्या केली.

याबाबत माहिती कोणाला होऊ नये म्हणून मोबाईल देखील लांब ठेवला असल्याचे त्याने सांगितले. तसेच घराच्या मागे दीड फूट खड्डा खणून महेशचा मृतदेह पुरला. त्यानंतर त्यावर सिमेंट टाकून तो भाग सपाट करुन घेतला, असेही तो म्हणाला.