तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाला गेलेल्या मित्रांसोबत घडली भयानक घटना; तिघांचा मृत्यू, १ बेपत्ता

मालवणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी मालवण तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

साकेडी मुस्लिमवाडी कणकवली येथील एकूण ११ जण मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी मोटारसायकलने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते. येथे व्हॉलीबॉल खेळत असताना सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी साहिल शेखने आरडाओरडा केला.

यामुळे इतर लोक त्या दिशेने धावले. मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले. अरबाज शेख याला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी मतीन हा बुडू लागला असता पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर आला. यामुळे तो देखील वाचला.

यावेळी सुफियान हा समुद्राच्या पाण्यात आत वाहून गेला. त्याचा शोध सुरु होता. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर व अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी योग्य त्या सूचना दिल्या.

दरम्यान, अरबाज, मतीन या दोघांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर डाक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तसेच इतर टीम याठिकाणी दाखल झाली. याठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.