९ वीतील हसत्या खेळत्या मुलाचा हार्टॲटॅकने मृत्यू; आईवडीलांचा काळीज पिळवटणारा आक्रोश

शाळेत असताना नववीतल्या एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हार्टअटॅकने आल्याने ही घटना घडली आहे. लेक्चर सुरू असताना मुलगा अचानक बेंचवरुन खाली कोळसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपाचारापूर्वीच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा विद्यार्थी एका खाजगी शाळेत शिकत होता. घटनेची माहिती आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला.

मुलाच्या मृत्यूच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तो शाळेत जाताना त्याची तब्येत एकदम ठणठणीत होती. मात्र शाळेत काय झाले कोणाला समजले नाही. 12 वाजता शाळेतून फोन आला आणि मुलाची तब्येत ठिक नसल्याचे सांगण्यात आले.

नंतर मात्र त्याचे निधन झाल्याचे घरच्यांना समजले. शाळेने सांगितलेल्या रुग्णालयात जेव्हा आम्ही पोहोचले. तेव्हा तिथे मुलगा किंवा शाळेतले कोणीही पोहोचलं नव्हतं. मुलाला एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान त्याचा श्वाच्छोश्वास सुरु होता. नंतर दुसऱ्या रुग्णालायत त्याला नेण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या रुग्णालयात नेण्याआधीच मुलाचा मृत्यू झाल्याचे वडिलांनी सांगितले. यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

शिक्षकांनी याबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिल्याने यावर संशय व्यक्त केला जात आहे. क्लाच टीचरने मुलगा मैदानात खेळताना पडल्याचे सांगितले. तर दुसऱ्या एका शिक्षकाने मुलगा वर्गात शिकत असताना बेंचवरुन पडल्याचे सांगितले. यामुळे चौकशीची मागणी केली जात आहे.