आंध्रप्रदेशच्या श्री सत्य साई जिल्ह्यातील धर्मावरम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश मंडपात नाचताना एक तरुण अचानक कोसळला. त्याला हृदय विकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचे निधन झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, गणपतीच्या मंडपात तो नाचत असताना ही घटना घडली आहे. एकाएकी कोसळतो. मारुती नगरमध्ये असलेल्या विनायक मंडपात रात्री ही घटना घडली. घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली.
यावेळी सगळे आनंदात असताना नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू पाहिल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. लगेच इतरांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला.
ती नाचत असताना आसपासचे लोक त्याचा नाच पाहत होते. नाचता नाचता प्रसाद त्यांच्यावर जाऊन पडला. तो २६ वर्षांचा होता. हृदय विकाराचा झटका आल्याने प्रसाद नाचता नाचता कोसळला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, हृदय विकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण गेल्या कित्येक महिन्यांमध्ये वाढले आहे. यामध्ये तरुणाईची संख्या मोठी आहे. तरुणांच्या अकाली मृत्यूंचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.