---Advertisement---

जोडपे करत होते बागेचे नूतनीकरण, जमिनीतून निघली भयानक गोष्ट, पाहून सगळेच हादरले…

---Advertisement---

एका जोडप्याने आपल्या बागेचे नूतनीकरण केले. पण हे करत असताना एक वेगळी गोष्ट घडली आहे. काम करत असताना जमिनीतून एवढी भयानक गोष्ट बाहेर आली की ते पाहून ते हादरले. त्यांनी थेट पोलिसांना फोन केला.

याबाबत महिलेने सांगितले की, तिला तिच्या बागेत हाडांनी भरलेला एक सुटकेस सापडली होती. नंतर पोलिसांनी ती जमिनीखालून बाहेर काढली. ते मानवी हाडांसारखे दिसत होते. रेबेका-लिन चोल्स नावाच्या महिलेचा पती त्यांच्या टेनेसीच्या घराच्या बागेत खोदकाम करत होता.

तो एका झाडाचे मूळ बाहेर काढत होता. बाहेर काढताच त्याच्या लक्षात आले की ते झाडाचे मूळ नसून प्रत्यक्षात हाड आहे. यामुळे त्याला एकच धक्का बसला. त्याने हिंमत एकवटून त्या हाडाच्या आजूबाजूच्या भागात अजून उकरण्यास सुरवात केली.

तेव्हा त्याला हाडांनी भरलेली सुटकेसच सापडली. याबाबत रिबेकाने सोशल मीडियावर सूटकेसचा फोटोही शेअर केला आहे. या हाडांची डीएनए चाचणी केली जात आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ठ होणार आहेत.

एकेकाळी या भागात मुक्तपणे फिरणाऱ्या सीरियल किलरने अशी हाडे जमिनीखाली लपवून ठेवली असावीत. पोलीस मात्र याला नकार देत आहेत. यामुळे या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी सुरुवातीला संपूर्ण प्रकरण समजून घेतले. नंतर याबाबत त्यांनी तपास सुरू केला आहे. काहींनी ही प्राण्यांची हाडे असल्याचे सांगितले आहे. याबाबत तपासात अनेक गोष्टी बाहेर येतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---