पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी खंबाटकी घाटाजवळ १८ वर्षीय मुलाचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे एका नाल्यात मृतदेह सापडला आहे. यामुळे पोलिसांनी याबाबत तपास केला आहे.
ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय १८) असे त्या मुलाचे नाव आहे. तो 5 दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र, आता त्याचा मृतदेह सापडला आहे. पुणे – खंबाटकी बोगदा संपल्यानंतर ध्रुवची दुचाकी सापडली. दुचाकीसह तो नाल्यात पडला होता. मोठ्या झुडूपांमुळे तो दिसून आला नाही. यामुळे 5 दिवसांपासून त्याचा तपास सुरूच होता. रस्त्यावरील झाडे काढताना त्याची दुचाकी दिसली.
यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. शोध घेतला असता ध्रुव याचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला आहे. तो इथे कसा आला.? त्याच्यासोबत काय घडलं याबाबत तपास सुरू आहे. ध्रुव हा पुण्यातील बावधन येथे एकटाच राहत होता.
ध्रुवच्या आत्याने त्याची चौकशी केली. मात्र, तो घरी नसल्याची माहिती तिला मिळाली. सीसीटीव्ही फुटेड चेक केल्यावर त्याने रात्री घर सोडल्याचे समोर आले. दरम्यान, त्याचे आईवडील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत होते. पारगाव खंडाळा आणि वाई असे लोकेशन पोलिसांनी सुरुवातीला मिळाले. नंतर रविवारपासून त्याचे लोकेशन मिळत नव्हते. मात्र आता त्याचा मृतदेह सापडला आहे.
दरम्यान, त्याचा मृतदेह सापडल्याने आई वडिलांना एकच आक्रोश केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून माहिती घेतली जात आहे.