राजकारण्यांनो तुमचं हिंदू-मुस्लिम चालु द्या! मुस्लिम कुटुंबाने धर्माच्या भिंती ओलांडून बसवल्या गौराई

बारामतीमधील मुस्लिम कुटुंबाचे कौतुक होत आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी जाती धर्माच्या भिंती ओलांडून गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. हिंदू धर्माचा महत्वाचा सण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

शेख कुटुंब हे गेल्या 8 वर्षापासून गणपतीची प्रतिष्ठापना करत आहे. गणपतीवर त्यांची श्रद्धा आहे. आता यावर्षी शेख कुटुंबाने गौराई बसवल्या आहेत. अनेकजण त्यांच्या गौराई बघण्यासाठी येत आहेत. तसेच याचे फोटो काढून घेत आहेत.

सर्वांनी एकोप्याने राहावे असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या जोडीला गौराई आली असून त्यांनी पहिल्यांदाच गौराई बसवल्या आहेत. यामुळे त्यांना वेगळाच आनंद झाला आहे.

दरम्यान, २५ वर्षांपूर्वी सोलापूरमध्ये कुर्टी या गावात काम करत असताना त्यांच्या वडिलांना गौराईचे मुखवटे सापडले होते. नंतर गौराईची स्थापना त्यांच्या घरी इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावात होते. मुस्लिम समाजात गौराई बसवल्या जात नाहीत.

असे असताना मात्र त्यांनी आता जी प्रथा सुरू केली. सध्या देशात हिंदू- मुस्लिम असे राजकारण होत असताना शेख कुटुंबाने हिंदू सणांद्वारे हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. यामुळे सर्वांनी एकत्र राहिले तर अजून बऱ्याच गोष्टी साध्य होतील.

दरम्यान, आपण सर्व एक आहोत, कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.