सध्या पुण्यात गणेशोत्सवामुळे सर्वच पेठा अगदी दणाणून निघाल्या आहेत. अनेक ठिकाणी एकापेक्षा एक देखावे बघायला मिळत आहेत. असे असताना एका तरुणीची भिडेवाड्यावरील फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती अशी की, दगडुशेठला हात जोडले की, भिडे वाड्याला पाठ होते या दोन ओळींनी या तरुणीने चपराक दिली आहे. ज्यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरु केली, त्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष होत आहे.
यामुळे याकडे तिने लक्ष वेधले आहे. फुलेंनी सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची अवस्था बिकट झाली असून दुरावस्था झाली आहे. याच्या जवळच दगडूशेठ गणपतीचे मंदिर आहे. काहींना तर ही शाळा कुठंय, भिडेवाडा काय? हे सुद्धा माहित नाही.
यामुळे योगेश्वरी नावाच्या तरुणीची ही फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, आज मैत्रीण विचारत होती की, दगडूशेठला येणार का ग! मी तिला विचारले की, तुला माहीत आहे का ग भिडेवाडा कुठे आहे म्हणून.
तर ती मला म्हणाली की काय आहे भिडेवाडा? माझ्या डोक्यात एवढी सनक गेली ना. जिथे मुलींची पहिली शाळा चालू झाली तो भिडेवाडा नाही माहीत हिला. पण नंतर लक्षात आलं, त्या बिचारीची काही चूक नाही. चूक तर ह्या व्यवस्थेची आहे.
जास्त काही बोलत नाही. फक्त एवढंच म्हणेल की, दगडुशेठला हात जोडले की, भिडे वाड्याला पाठ होते…! हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं! अशी पोस्ट तिने केली आहे. यामुळे तिची चर्चा सुरू झाली आहे.