अहमदनगरमधील बेलापूर रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली होती. याठिकाणी दरोडा टाकून दरोडेखोरांनी एका युवकाची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना याबाबत आता एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.
येथील एकलहरे गावात दरोडेखोरांनी नईम पठाण याची हत्या केली होती. तसेच 7 लाख रुपये घेऊन ते पळून गेले होते. आता या दरोड्याप्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. याबाबत पत्नीनेचे पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
नईम पठाण याची पत्नी बुशरा पठाणनेच पतीला मारल्यानंतर दरोड्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर साडीने गळा आवळून पत्नीने हे कृत्य केले आहे. यामुळे घटना उघडकीस आली की खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी याबाबत नईमची पत्नी बुशरासह आणखी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांनी मारहाण करत घरातील ऐवज चोरून नेल्याचे सांगितले होते. याबाबत पोलिस तपास सुरू आहे. या धक्कादायक खुलाश्याने या संपूर्ण प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.
दरम्यान, दरोड्याचा बनाव करत पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आल्याने नातेवाईकांना एकच धक्का बसला आहे. तिने हे का केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे याबाबत सध्या तपास सुरू आहे.