पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांची तयारी सुरू केली आहे. भाजपने यासाठी कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
नंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील भेट दिली. तसेच नंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेले. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे.
यामध्ये शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी केल्याची माहिती आहे. असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने लोकसभेच्या काही जागांवर चाचपनी सुरू केली आहे.
यामध्ये मुंबईतून अभिनेत्री माधुरी दीक्षित, जळगावमधून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, धुळ्यातून माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर तसेच पुण्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावावर चर्चा अमित शहा यांनी केल्याची माहिती आहे.
यामुळे येणाऱ्या काळात त्यांना लोकसभेची तिकिटे मिळाली तर नवल वाटायला नको. यामुळे सध्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माधुरी दीक्षित राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीत त्यांना मुंबईतून तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी केली आहे. याच धर्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित, सुनील देवधर, प्रताप दिघावकर, उज्ज्वल निकम या चार नावांची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याची माहिती आहे.