घराच दार उघडल अन् मृत्यू आत शिरला, नागपूरच्या पावसाची अंगावर काटा आणणारी कहाणी, घडलं भयानक

दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये तुफान पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. या पावसामुळे घरात पाणी शिरून दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला.

या पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले व घराघरांत पाणी शिरले. वाहने वाहात गेली. सखोल वस्त्यांमध्ये बोटी फिरवून रहिवाशांना घरातून बाहेर काढावे लागले. घरांतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, गाड्यांचे, तसेच व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.

असे असताना महेशनगर भागात एक दुःखद घटना घडली. येथे पाणी साचले असतानाच एका महिलेने घराचा दरवाजा उघडला. त्यामुळे पाण्याचा लोट घरात आला व एकट्याच राहणाऱ्या मीराबाई कप्पूस्वामी पिल्ले यांचा मृत्यु झाला.

घरात साचलेल्या पाण्यातच पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू ओढवला. तसेच महेशनगर परिसरातील एका घरात संध्या श्यामराव ढोरे (५०) यांचाही पुराचे पाणी घरात शिरल्याने मृत्यू झाला. या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संध्या व त्यांच्या आई सयाबाई ढोरे (७२) या एका खोलीत राहायच्या. नातेवाईकांनी संध्या यांना पलंगावर ठेवले. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी शहरात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मदतीची मागणी केली जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवश्यक त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी काही ठिकाणी भेटी देखील दिल्या. यावेळी नागरिकांनी रोष व्यक्त केला. नागरिक मदतीची मागणी करत आहेत.