पुण्यात भरधाव कारने शेतमजूरांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी; अपघाताचा थरार वाचून काटा येईल

राज्यात अपघातांची मालिका सुरू असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर डिंगोरे जवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडले आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच दोघे जखमी आहेत. त्यांच्यावर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून ते मध्यप्रदेशमधुन कामाला आले होते.

गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. नगर – कल्याण महामार्गावर डीगोरे परिसरात पाच शेत मजूर मध्यप्रदेश येथून आले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना हा अपघात झाला आहे.

महामार्गावरून एक चारचाकी भरधाव वेगात होती. त्या गाडीने या पाच मजुरांना चिरडले. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान, सध्या हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय. प्रशासनाने गावागावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. रोज याठिकाणी अपघात घडत आहेत. गेल्याच आठवड्यात याठिकाणी मोठा अपघात झाला होता.