डोंबिवली हादरली! बापानेच मुलीची केली गळा दाबून हत्या, कारण ऐकून बसेल धक्का…

बापाने आपल्याच 9 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतल्या मानपाडामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आला आहे. मनोज कुमारला चार मुली आहेत. यातील एक मुलगी 9 वर्षांची होती. ती गतीमंद होती. ती सारखी आजारी असायची. यामुळे बापाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मनोज कुमारला अटक केली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या मुलीला ऐकायला आणि बोलायला येत नव्हते. तिच्या आजारपणाला मनोज कुमार हा कंटाळला होता. यामुळे तो नैराश्यातही होता. यामुळे त्याने हे कृत्य केल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी याबाबत तपास केल्यावर सगळ्या गोष्टी समोर आल्या. घटनेने मात्र सर्वांना धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारपणात पूर्णपणे हताश झाला असल्याची देखील माहिती समोर येत आहे.