भावाने बहिणीच्या घरातच केली चोरी; पोलिसांनी सूत्रं फिरवताच धक्कादायक कारण आले समोर…

काही दिवसांपूर्वी मेहुण्याच्या घरात साल्यानेच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चोरी केलेल्या ४० लाखांपैकी ३६ लाख रुपये व चोरीच्या पैशातून खरेदी केलेले दागिने पोलिसांनी मेहुण्याला परत केले. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, बगतसिंह हरिसिंह हे सोलापूर- धुळे महामार्गावरील साजापूर फाटा येथे वसुलीचे काम करतात. बगतसिंह यांचा साला दशरथसिंह क्रांतिसिंह याने मेहुणा बगतसिंह यांच्या घरातून ४० लाखांची बॅग चोरली होती. यामुळे याची मोठी चर्चा झाली.

नंतर पोलिसांनी आरोपी दशरथसिंह याला मध्य प्रदेशात मौजमजा करताना अटक केले. त्याच्याकडून घडलेला सगळा प्रकार समोर आला आहे. दशरथसिंह याने प्रदीपकुमार जोशी याच्यासोबत चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रदीपकुमार जोशी यास ताब्यात घेतले होते.

नंतर पोलिसांनी ३५ लाख ८० हजार रुपये जप्त केले होते. आरोपींनी सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चेन, मोबाइल खरेदी केले होते. हा चोरी झालेला ऐवज आता परत मिळाला आहे. आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेले ३५ लाख ८० हजार रुपये न्यायालयाने मूळ मालक मेहुणा बगतसिंह यांना परत देण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहा. आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहा. फौजदार कडू, पेद्दावाड, पोहेका, यांनी याबाबत तपास केला.

हा ऐवज चोरीला गेल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना हा ऐवज परत मिळाल्यामुळे पोलिसांचे बगतसिंह यांनी आभार मानले आहेत.