डॉक्टरचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, क्लिनिकमध्येच धक्कादायक कृत्य, पुण्यातील संतापजनक प्रकार…

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावले. त्यानंतर दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती. २० वर्षीय पीडित तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सोशल मीडियावरुन तिची डॉ. शुभंकर याच्यासोबत ओळख झाली होती. यानंतर डॉक्टरने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली.

वारंवार मॅसेज करुन ओळख वाढवली. त्यानंतर पीडितेचा विश्वास संपादन करत तिला क्लिनिकमध्ये बोलावून घेतले. तिथे आरोपीने तिला जबदस्तीने दारु पाजली. नंतर तिला गुंगी आली. नंतर आरोपीने तिच्यासोबत गैरकृत्य करत बलात्कार केला.

नंतर ती शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. नंतर तिने पोलिस ठाणे गाठले. झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. विश्रामबाग पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तरुणी खूप घाबरली होती.

पोलिसांनी लगेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. डॉ. शुभंकर महापुरे (वय २६ वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेने मात्र पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.