गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपात्र आमदारांच्या सुनावणीबाबत चर्चा सुरू आहे. असे असताना याबाबत आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी विलंब होत असल्याने सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते.
यामुळे राहुल नार्वेकर यांनी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांनी अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे. १३ तारखेला सर्व याचिका एकत्र करायचा की नाही यावर सुनावणी पार पडेल. २० ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.
२७ ऑक्टोबरला दोन्ही गट आपापले म्हणणे मांडतील. ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपापली मांडणी करतील आणि दावे प्रतिदावे करतील. १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी होईल.२० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.
२३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल. सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे यामध्ये काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.