डीजेच्या दणदणाटामुळे झाला दोघांचा मृत्यू; सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान धक्कादायक घटना

राज्यात सध्या सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. यामध्ये तरुणांचा डीजेवर होणारा डान्स अनेकांच्या जीवावर बेतला आहे. याबाबत सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. शेखर पावशे आणि प्रवीण शिरतोडे अशी दोघा मृतांची नावे आहेत. डीजेमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे.

यापैकी एकाची अँजिओप्लास्टी झाली होती. डीजेच्या आवाजामुळे हार्टबीट वाढून हृदयविकाराचा झटका आला, असे घरच्यांनी सांगितले. यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजे किती महत्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तासगावमध्ये कवठेएकंद गावचे शेखर पावशे, वय केवळ ३२ वर्षं, यांची दहा दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली होती. असे असताना रात्री विसर्जन मिरवणूक पाहायला शेखर गेला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डीजेचा आवाज होता. यावेळी त्यांना दम लागू लागला. तो भोवळ येऊन पडला, आणि यातच त्यांचे निधन झाले आहे.

तसेच दुधारी गावातही 35 वर्षांचा प्रवीण शिरतोडेही विसर्जन मिरवणूक पाहायला गेला होता. यावेळी त्याला चक्कर आली आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.

यामध्ये शेखरची अँजिओप्लास्टी झाली होती. हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी डीजे वाजत असलेली ठिकाणं किंवा विसर्जन मिरवणुका टाळाव्यात, असे डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.