समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा चुराडा

गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग खुप चर्चेत आहे. या महामार्गावर अपघात झाल्याच्या अनेक घटना घडत आहे. गेल्या आठवड्यात याच महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता.

बुलढाण्यात झालेल्या या अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सांगवीजवळ हा अपघात झाला असून यामध्ये एका ट्रॅव्हलचा चुराडा झाला आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकची धडक झाली होती. या धडकेत ट्रॅव्हलच्या समोरच्या भागाचा पुर्ण चुराडा झाला आहे. या भयानक अपघातात २० जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या २० पैकी ११ जणांची प्रकृती ठिक असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९ जणांवर अजूनही उपचार सुरु आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. हा अपघात रात्री झाला आहे.

रात्रीच्या सुमारात गेट नंबर १६ जवळ ट्रॅव्हल्स होती. त्यावेळी अचानक ट्रकने येऊन या ट्रॅव्हल्सला धडक दिली. ट्रक ड्रायव्हर हा खुप वेगात होता. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघातात प्रवासीही जमखी झाले पण सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर सुरु असलेली अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या काही महिन्यात या महामार्गावर हजारहून अधिक अपघात झाले आहे. वारंवार भीषण अपघात होत असल्यामुळे आता प्रवासीही या महामार्गावरुन येणं टाळत आहे.