बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी त्यांच्या कामांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. तसेच काही सेलिब्रिटी हे मुलाखत देत असताना आपल्या खाजगी आयुष्याबद्दल असे काही सांगून जातात, ज्यामुळे संपुर्ण बॉलिवूडमध्येच खळबळ उडते. असाच काहीसा खुलासा आता समोर आला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती आणि दिग्दर्शक शेखर कपुर यांच्या घटस्फोटाला १५ वर्षे होऊन गेली आहे. पण त्यांचा घटस्फोट नक्की का झाला होता? याचे कारण कोणालाही माहिती नव्हते. पण आता १५ वर्षानंतर त्यामागचे कारण समोर आले आहे.
सुचित्राने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने अभिनेत्री प्रिती झिंटामुळे माझा घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे. सुचित्राने दिलेल्या मुलाखतीत प्रिती झिंटामुळे माझा आणि शेखर कपूरचा संसार मोडल्याचे तिने म्हटले आहे.
प्रितीने सुचित्राला असे म्हटले होते की मी आघाडीची अभिनेत्री आहे आणि तु तर काही कामही करत नाही. एक गृहिणी म्हणून आयुष्य जगतेय. तुला एका मानसोपचारतज्ञाची गरज आहे. त्या वक्तव्यावर आता सुचित्राने प्रतिक्रिया देत मोठे खुलासे केले आहे.
सुचित्रा आणि शेखर यांच्या नात्यामध्ये प्रिती आली होती. त्यामुळे प्रिती आणि सुचित्रा यांच्यात मोठे भांडण झाले होते. त्यावेळी प्रितीने सुचित्राला गृहिणी म्हणून डिवचले होते. त्यानंतर प्रितीने याबद्दल माफीही मागितली होती. पण तिने तिला माफ केले नाही.
मला तिला माफ करण्याची काही गरज नाही. कारण माझ्यासाठी ती आता महत्वाची राहिलेली नाही. मी माझ्या आयुष्यात खुप आनंदी आहे. पण ज्या लोकांमुळे मला भूतकाळात त्रास झालाय त्या माणसांशी मला कधीही संवाद साधायचा नाहीये, असे सुचित्राने म्हटले होते. सुचित्रा आणि शेखरचे १९९७ साली लग्न झाले होते. पण २००६ साली त्यांचा घटस्फोट झाला होता.