सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये १९८७ मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तब्बल ३६ वर्षे फरार इसमास शिताफीने पकडण्यात आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
लाला सिध्दाम तेली, असे या इसमाचे नाव आहे. मनव येथील बाळू सरगर, दत्तू सरगर वगैरे यांनी गावातीलच भीमराव सिध्दाम तेली सन १९८३ मध्ये खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याने पाल-खंडोबा (ता. कराड) दत्तू ज्ञानु यालमारे यांचा घातक हत्याराने निर्घुण खून केला होता.
त्यातील आरोपी लाला तेली हा गुन्हा घडल्यापासून ३६ वर्षे फरार होता. अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना खबरीकडून लाला तेली हा मनव गावी आपल्या घरी येणार असल्याची बातमी दिली होती. यामुळे पोलीस तयारीला लागले होते.
बापू बांगर यांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शेळके, फौजदार विश्वास कडव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. यानंतर लाला तेली यास मध्यरात्री त्याच्या घरातून लाला यास शिताफीने अटक करण्यात आली.
दरम्यान, तेव्हाच्या हत्येचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी लाला सिध्द्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून सुमारे 36 वर्ष फरार झालेला होता. यामुळे तपास सुरू होता.
आता तब्बल 36 वर्षांनंतर रोजी पोलिसांना त्याची माहिती मिळाली. तसेच तपास करून त्यांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपी लाला तेली याला अटक केली. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.