जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने संपवले जीवन, चिठ्ठीत लिहून ठेवलं धक्कादायक कारण…

प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याने तळेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. याबाबत तपास सुरू आहे.

डेबू खान हा घरी एकटा राहत होता. त्याने सोमवारी दुपारच्या वेळेत पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. तो घरी एकटाच होता. आर्थिक देवाण घेवाणीतून फटका बसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. 

डेबू बरोबर फ्लॅटवर आणखी कोण कोण राहत होते, त्याचे कुठे आर्थिक व्यवहार सुरू होते, याचा तपास पोलिस करत आहेत. डेबू याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी याबाबत माहिती दिली आहे. सकाळपासून त्याने घराचे दार उघडलेच नाही. दुपारी घर मालकिणीला शंका आल्याने तिने डेबूच्या भावाशी संपर्क साधला.

भावानेही लगेच डेबूशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमटणे फाटा गाठला. त्याने डेबू राहत असलेले घराचे दार ठोठावले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

दार तोडून आत प्रवेश केल्यावर बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे समोर आले. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचे अन् त्यातून फटका बसल्याचे म्हटले आहे.

चिठ्ठीत ज्यांच्याशी पैशांची देवाण-घेवाण केली, त्यांची नावही आहेत. त्याच आधारावर तळेगाव पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.