बकऱ्यांसाठी गवत कापायला रानात गेला अन् माघारी येताच करोडपतीच झाला! मजुराच नशीब बदललं अन् गावात जल्लोष झाला…

नशीब कधी कोणाच चमकेल आणि कोण कधी करोडपती होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता एका मजुराच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडले आहे. रोजंदारीवर काम करणारा एक मजूर अवघ्या काही तासांमध्ये कोट्यधीश झाला आहे. यामुळे त्याची चर्चा सुरू आहे.

तो आपल्या बकऱ्यांसाठी गवत कापायला गेला. घरी परतला त्यावेळी तो कोट्यधीश बनला होता. यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद झाला होता. अवघ्या ४० रुपयांच्या लॉटरीच्या तिकिटाने त्याचे नशीब पालटले आहे. विशेष म्हणजे त्याने पैसे नव्हते म्हणून पैसे उधार घेतले होते.

या मजुराचे नाव भास्कर माजी आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धवान जिल्ह्यातील आहे. त्यांच्या घरची परिस्थिती खूपच बिकट आहे. भास्कर यांना लॉटरीची तिकिट खरेदी करण्याचा नाद आहे. १० वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटं घेतात.

इतक्या वर्षांनंतर आता त्यांचे नशीब पालटले आहे. १ ऑक्टोबरला त्यांनी ४० रुपये उधार घेऊन लॉटरीचे तिकिट खरेदी केलं होतं. यामध्ये त्यांना लॉटरी लागली. यामुळे त्यांच्या घरी मोठी गर्दी झाली होती. या घटनेवर त्यांना देखील विश्वास बसत नव्हता.

दरम्यान, लॉटरीची घोषणा झाली. त्यात भास्कर यांना १ कोटी रुपये जिंकले. दुकानदाराने ही गोष्ट ग्रामस्थांना सांगितली. यानंतर गावात जल्लोष झाला. त्यांना अनेकदा घरातून याबाबत बोलणं खावे लागत होते. घरी खायची पंचाईत पण लॉटरी तिकीट कशासाठी असे घरचे ओरडत असायचे.

याबाबत ते म्हणाले, लॉटरीच्या पैशांतून सर्वप्रथम नवं घर बांधू. शेतीसाठी आमच्याकडे जमीन नाही. त्यामुळे शेतजमीन खरेदी करू. दोन मुली आहेत. त्यांच्या लग्नासाठी काही रक्कम वेगळी काढून ठेऊ. बाकीच्या पैशांतून एखादा व्यवसाय सुरू करू, असे त्यांनी सांगितले.