---Advertisement---

मित्रानेच काढला मित्राचा काटा! मुळशी धरणाजवळ नेलं अन् केले सपासप वार, हादरवणारं कारण आलं समोर

---Advertisement---

मुळशी तालुक्यात एक खळबळजनक घटना उडाली आहे. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकरावर विळ्याने वार करून मृतदेह मुळशी धरणात फेकून दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अक्षय याने किशोरला माझ्यासोबत चल असे म्हणून त्याला सोबत घेतले. सुस गावातून गाडीवर घेऊन वारक या गावाजवळ आला.

याठिकाणी मुळशी धरणाच्या पाण्याजवळ घेऊन आला. लघुशंका करण्याच्या निमित्ताने त्याने किशोर याच्या पाठीमागून त्याच्यावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात किशोरचा जागेवरच मृत्यू झाला. नंतर त्याने हात पाय कपड्याने बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणात फेकून दिला.

दरम्यान, पोलिसांना किशोर हा अक्षय सोबत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत. किशोर बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलिसात दिली होती. यामुळे पोलीस याबाबत तपास सुरू केला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---