पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यामुळे पुण्यात याची चर्चा रंगू लागली आहे.
याठिकाणी मैत्रीपूर्ण संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविका बलात्कार Pune Ex Corporator Raped करण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. सचिन मच्छिंद्र काकडे ( वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, तुझ्या पतीला फोटो दाखवेल, अशी धमकी देत आरोपीने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला. 2017 पासून याबाबत छळ सुरू होता. तसेच आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये देखील घेतले होते. दरम्यान, वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक देखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र पुण्यात खळबळ उडाली आहे.