काळीज चिरणारा आक्रोश हा गेल्या काही दिवसांपासून भोवऱ्यात अडकलेल्या नांदेडच्या Nanded hospital विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ऐकायला मिळत आहे. याठिकाणी २२ वर्षीय अंजली वाघमारेंना शनिवारी प्रसूतीसाठी दाखल केलं. त्यांनी चिमुकलीला जन्म दिला रुग्णालयाकडून दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची सांगण्यात आलं
नंतर मात्र फक्त ४ दिवसांच्या अंतराने दोन्ही मायलेकींचा अचानक मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. लोहा तालुक्यातील अंजली वाघमारे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांची प्रसूती झाली.
दरम्यान, प्रसूती नाॅर्मल होऊन होऊन त्यांनी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माने कुटुंबीय खूप आनंदात होते. असे असताना मात्र तीन दिवसानंतर त्या बाळाची प्रकृती अचानक खालावली आणि त्या बाळाचा मृत्यू झाला.
बाळाच्या मृत्यूने आईला धक्काच बसला. त्यानंतर अंजली यांचीही प्रकृतीही बिघडत गेली. नंतर उपचारा दरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी आरोग्य यंत्रणेवर आरोप केले जात आहेत.
दरम्यान, याठिकाणी सर्व औषधी आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. यासाठी ४० ते ४५ हजारांचा खर्च झाला. १४ रक्ताच्या पिशव्या बाहेरून आणाव्या लागल्या, मात्र तरीही जीव वाचले नाहीत.
वीट भट्टीवर काम करून पोटाची खळगी भरणार हे कुटुंब. खिशात पैसा नाही म्हणून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पण, शेवटी पै-पै करत पैसा जमवला. हाती काहीच लागले नाही, यामध्ये डॉक्टरांची चूक असल्याचे सांगितले जात आहे.